राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केलं. नंतर त्यांनी अक्षयवट आणि बडा हनुमान मंदिर इथेही भेट दिली. महाकुंभात आतापर्यंत 43 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केलं असून तो येत्या 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.