राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून हरियाणा, चंदीगड आणि पंजाबच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, राष्ट्रपती हिसार इथं गुरु जंभेश्वर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. तसंच ब्रह्माकुमारींच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्त ‘समग्र कल्याणासाठी आध्यात्मिक शिक्षण’ या राज्यस्तरीय मोहिमेचा शुभारंभ करतील.
उद्या, राष्ट्रपती पंजाब केंद्रीय विद्यापीठ आणि भटिंडा इथल्या एम्सच्या दीक्षांत समारंभ, मोहाली इथं पंजाब सरकारने आयोजित केलेल्या नागरी स्वागत समारंभ, आणि बुधवारी, राष्ट्रपती चंदीगड येथील पंजाब विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील.