महिला दिनाच्या निमित्तानं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नारी शक्ती से विकसित भारत या एक दिवसीय संमेलनाचं उदघाटन झालं. महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो, या दिनाचं औचित्य साधून सर्वानी लिंगभाव समानतेत सुधारणा घडवून आणण्याचा संकल्प करूया असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार विविध योजना राबवत असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.
केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री अन्नपूर्णा देवी या संमेलनात सहभागी झाल्या आहेत. या परिषदेनंतर उच्चस्तरीय पॅनेल चर्चा आणि तीन तांत्रिक सत्रं होणार आहेत.