डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नवसंशोधक आणि उद्योजकांनी पारंपरिक समुदायांचं उपजत ज्ञान दुर्लक्षित करता काम नये – राष्ट्रपती द्रौपदी

नवसंशोधक आणि उद्योजकांनी पारंपरिक समुदायांचं उपजत ज्ञान दुर्लक्षित करता काम नये असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज झारखंडमध्ये रांची इथं मेसरा इथल्या बिर्ला तंत्रज्ञान संस्थेच्या अमृतमहोत्सव सोहळ्यात बोलत होत्या. ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रशिक्षण यांच्यात झालेल्या अनोख्या बदलांमुळे भविष्यात नाट्यमय परिवर्तन अनुभवायला मिळेल असं त्या म्हणाल्या. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवकांचा उत्साह आणि वचनबद्धता महत्वपूर्ण भूमिका निभावत असल्याचं त्यांनी सांगितलं. विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि गणिताच्या शिक्षणात मुलीही मागे नसल्याचं मुर्मू यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा