राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या आंध्र प्रदेश दौऱ्यादरम्यान, राष्ट्रपती एम्स मंगलागिरीच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील आणि सिकंदराबाद येथील निलयम इथं विविध उपक्रमांची पायाभरणी करतील. राज्यातील मान्यवर, प्रमुख नागरिक आणि शिक्षणतज्ञ यांच्यासाठी निलयम इथं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, सिकंदराबादच्या कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंटला राष्ट्रपतींच्या हस्ते प्रेसिडेंस कलर प्रदान करण्यात येणार आहे.
Site Admin | December 17, 2024 9:52 AM | President Draupadi Murmu