राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पोर्तुगाल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज पोर्तुगालच्या संसदेला भेट दिली. तिथं त्यांना पारंपरिक मानवंदना देण्यात आली. सभापती जोस पेद्रो अग्वार ब्रांको यांच्याशी आणि इतर संसद सदस्यांशी त्यांनी सौहार्दपूर्ण चर्चा केली. राष्ट्रपतींनी चंपालमो फाऊंडेशन आणि राधाकृष्ण मंदिराला भेट दिली. त्यानंतर अलमेडा इथं राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यावर आदरांजली अर्पण केली. पोर्तुगालमधल्या भारतीय समुदायाशी त्यांनी संवाद साधला.
उद्या आणि परवा म्हणजे ९ आणि १० तारखेला राष्ट्रपती स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारताच्या राष्ट्रपतींनी स्लोव्हाकियाला भेट देण्याची गेल्या २९ वर्षातील ही पहिलीच वेळ आहे.