डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रपती यांची पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रेबेलो डी सौसा यांच्याशी चर्चा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष  मार्सेलो रेबेलो डी सौसा यांची भेट घेऊन शिष्टमंडळस्तरीय चर्चा केली. त्यानंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात राष्ट्रपती म्हणाल्या, की भारत आणि पोर्तुगाल दरम्यानचे नाते संबंध ऐतिहासिक असून आता ते अधिक आधुनिक आणि बहुआयामी झाले आहेत. या बैठकी पूर्वी मुर्मू यांनी पोर्तुगालचे राष्ट्रकवी लुई वाझ डी कामोस यांच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. पोर्तुगालचे प्रधानमंत्री लुई मॉन्टेनेग्रो आणि संसदेचे सभापती जोस पेद्रो अग्वार ब्रांको यांचीही त्या भेट घेणार आहेत. पोर्तुगालमधल्या भारतीय समुदायाशी मुर्मू संवाद साधतील. भारत – पोर्तुगाल राजनैतिक संबंधांना यंदा ५० वर्ष पूर्ण होत आहेत आणि २७ वर्षांनंतर प्रथमच भारताच्या राष्ट्रपतींनी पोर्तुगालला भेट दिली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा