राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं आदी महोत्सव २०२५ चं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात त्यांनी गेल्या १० वर्षात आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रभावी पावलं उचलण्यात आल्याचं प्रतिपादन केलं.
आदिवासी लोकांच्या परंपरा आणि राहणीमान देशाची संस्कृति समृद्ध करतात, असं त्या म्हणाल्या. यंदाच्या अर्थसंकल्पात आदिवासींसाठी आर्थिक तरतूद तिपटीनं वाढवली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं .