डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

स्त्री शक्ती,यश साध्य करून योगदान देण्यासाठी वृद्धींगत होत आहे- राष्ट्रपती

देशातली स्त्री शक्ती, आकांक्षा बाळगत यश साध्य करून योगदान देण्यासाठी वृद्धींगत होत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी केलं आहे. महिलांनी मोठी स्वप्न पहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी धैर्य, ताकद आणि क्षमता गोळा करण्याचं आवाहन केलं आहे. बंगळुरू इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरने आयोजित केलेल्या 10व्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या प्रतिनिधींना त्या संबोधित करत होत्या.

 

महिलांनी निर्भय असावे, महत्त्वाकांक्षी ध्येये निश्चित करून अडथळे पार केले पाहिजेत. तसंच रुढीवादी कल्पनांना आव्हान दिले पाहिजे असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाळ्या. प्रत्येक व्यक्तीने करुणा, प्रेम आणि एकता या मानवी मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करताना, अर्थपूर्ण जीवन जगणे आणि कुटुंब, समाज आणि जगामध्ये योगदान देण्यासाठी महिलांच्या मानसिक आरोग्य राखणे गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा