युवकांच्या कल्पनाशक्तीला वाव देणाऱ्या अविष्कार २०२४ या महोत्सवाची विभागीय फेरी काल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पार पडली. कोल्हापूर इथल्या डी वाय पाटील विद्यापीठाचे संशोधन-संचालक तथा अधिष्ठाता डॉक्टर सी. डी. लोखंडे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या आविष्कार महोत्सवासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून -१२५, जालना-२५, बीड-४५, तर धाराशिव जिल्ह्यातून -६२ असे २४८ संशोधक विद्यार्थी सहभागी झाले. विविध शाखांमधून १७५ प्रकल्प या फेरीत सादर झाले असून, विद्यापीठस्तरीय अंतिम फेरी आज होणार आहे.
Site Admin | December 15, 2024 9:34 AM | Aviskar 2024 university