भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या स्पॅडेक्स मिशनची तयारी अंतिम टप्यात आली आहे. या मिशन अंतर्गत एकाचवेळी दोन उपग्रहांचं एकत्रित प्रक्षेपण करण्यात येणार आहे. येत्या 30 डिसेंबरला सोमवारी श्रीहरिकोटा इथून हे प्रक्षेपण होणार आहे. एकत्रित प्रक्षेपपणानंतर दोन्ही उपग्रह विभक्त झाल्यानंतर दोन वर्षांपर्यंत कार्यरत राहतील. अशाप्रकारचं मिशन राबवणारा भारत जगातला चौथा देश ठरेल.
Site Admin | December 25, 2024 12:35 PM | ISRO | spadex mission