डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात

राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती दिली. 

‘‘राज्यात मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात मतदान केंद्राच्या संख्येत वाढ केली असून, एकूण एक लाख १८६ मतदान केंद्र असल्याचं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. यामध्ये शहरी मतदान केंद्र ४२ हजार ६०४, तर ग्रामीण मतदान केंद्र ५७ हजार ५८२ इतकी आहेत. शहरी भागातल्या मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातल्या मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं, यासाठी राज्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, आदी शहरांमध्ये अतिउंच इमारती, सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुलं यामध्ये एकूण एक हजार १८१ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.

 

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत एकंदर ४६ हजार ६३० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहितीही चोक्कलिंगम यांनी दिली. या कालावधीत राज्यात २५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. २८८ पैकी १८५ मतदारसंघांमध्ये एक, १०० मतदारसंघांमध्ये दोन, तर ३ मतदारसंघांमध्ये तीन बॅलेट युनिट्स लावण्यात येणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मतदानाच्या सुरुवातीला आणि मतदान संपल्यानंतर मतदान यंत्रांमध्ये किती चार्ज आहे, याची नोंद ठेवण्याच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निर्णय घेऊ, असंही चोक्कलिंगम यांनी सांगितलं. येत्या २० तारखेला मतदान करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं.’’

सर्वाधिक वाचले

सर्व पहा