उत्तर प्रदेशात प्रयागराज तीर्थ इथं उद्यापासून महाकुंभ मेळा सुरू होत असून उद्याच्या पौष पौर्णिमेच्या पुण्यकाळात पहिलं शाही स्नान होणार आहे.
यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांना या पर्व काळात शुद्ध हवेचा पुरवठा व्हावा यासाठी विशेष जंगल क्षेत्र विकसित करण्यात आली आहेत. गेल्या 2 वर्षात प्रयागराज शहरात १० ठिकाणी ५५ हजार चौरस मीटरवर ६३ प्रकारची १ लाख २० हजार झाडं लावून हे जंगल विकसित करण्यात आलं आहे.