केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक क्षेत्रातल्या आणि भांडवली बाजारातल्या भागधारकांची बैठक घेतली. अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालची ही सातवी अर्थसंकल्प-पूर्व सल्लामसलत बैठक होती. केंद्रीय अर्थ सचिव, आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागार या बैठकीला उपस्थित होते.
Site Admin | January 2, 2025 8:05 PM | Pre-Budget Consultation
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आर्थिक क्षेत्रातल्या आणि भांडवली बाजारातल्या भागधारकांसोबत बैठक
