ऑस्ट्रेलियात ग्रँपियन्स राष्ट्रीय पार्कमध्ये लागलेल्या वणव्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथोनी अल्बानिज यांनी आज घेतला. या आगीमुळे नुकसान सोसावं लागलेले कामगार आणि दुकानदारांना नुकसानभरपाई दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. सहा डिसेंबरला वीज पडल्यामुळे सत्तर हजार हेक्टरवरच्या जमिनीवर वणवे लागले होते. या वणव्यांमध्ये मनुष्यहानी झाली नसली तरी बरचसं पाळीव पशूधन नष्ट झालं. हा वणवा अजून काही आठवडे धुमसत राहण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
Site Admin | December 29, 2024 8:03 PM
ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथोनी अल्बानिज यांनी घेतला ग्रँपियन्स राष्ट्रीय पार्कमध्ये लागलेल्या वणव्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा
