डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणार – मुख्यमंत्री

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवू. या प्रकरणातल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितलं.

 

सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणातील तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली. प्रवीणचा भाऊ शुभम फरार आहे. हे दोघंजण अकोल्यातल्या अकोट इथले रहिवासी आहेत. या दोघांनीच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे. प्रवीण लोणकर याची मुंबई पोलिस चौकशी करत असून आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं घेतल्याची पोस्ट शुब्बू लोणकर या व्यक्तीनं त्याच्या अकाउंटवरून पोस्ट केली. या पोस्टमध्ये सलमान खान आणि दाऊद गँगचाही उल्लेख होता.  पोलिसांनी या अकाऊंटचा शोध घेतला असता ते शुभम लोणकर याचेच असून त्यानंच ही पोस्ट लिहिली आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा