महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं येत्या सोमवारपासून प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. दर सोमवारी आणि शुक्रवारी या उपक्रमाअंतर्गत कामगार आणि प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचनांवर स्थानिक पातळीवर तोडगा काढला जाणार आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एस. टी. चे विभाग नियंत्रक सकाळच्या सत्रात प्रवाशांच्या तर दुपारच्या सत्रात कामगारांच्या लेखी तक्रारी स्वीकारणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यासाठी या उपक्रमाचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे.
Site Admin | July 13, 2024 9:16 AM | प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ