परराष्ट्र मंत्रालयानं आज प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार जाहीर केले. एकूण २७ व्यक्ती आणि संस्थांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात गयानातली सरस्वती विद्या निकेतन, रशियातला हिंदुस्थानी समाज यांना सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियातले प्राध्यापक अजय राणे, फिजीतले स्वामी संयुक्तानंद, सिंगापूरमधले अतुल टेंभुर्णीकर यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश आहे. ८ ते १० जानेवारी दरम्यान ओडिशात भुवनेश्वरमध्ये प्रवासी भारतीय दिवस परिषद होणार आहे. या परिषदेच्या समारोप समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे पुरस्कार वितरीत करतील.
Site Admin | January 3, 2025 8:18 PM
प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार जाहीर
