नेपाळमध्ये काठमांडू इथं आज ‘प्रवासी भारतीय दिन’ साजरा करण्यात आला. नेपाळमधल्या भारतीय दूतावास आणि भारतीय नागरिक संस्थेतर्फे त्याचं आयोजन करण्यात आलं होतं . यावेळी भारतीय नागरिक संस्थेचे अध्यक्ष मनोज कांदोई यांनी नेपाळच्या प्रगतीमध्ये भारतीय नागरिकांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. नेपाळमधले भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव आणि मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक यावेळी उपस्थित होते.
Site Admin | January 9, 2025 8:04 PM | Nepal | Pravasi Bharatiya Divas
नेपाळमध्ये काठमांडू इथं ‘प्रवासी भारतीय दिन’ साजरा
