लिंगभाव समानता आणि महिला सबलीकरण हे भारताच्या परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे अविभाज्य घटक असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी आज केलं. भुवनेश्वरमध्ये सुरू असलेल्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या चौथ्या दिवसाच्या अध्यक्षपदाच्या भाषणात ते बोलत होते. डायस्पोरा दिवस – महिलांचं नेतृत्व आणि प्रभाव या संकल्पनेवर आधारित सत्राला संबोधित करताना जयशंकर म्हणाले की, सामाजिक रचनेत लिंगावर आधारित भेदभाव हा कौटुंबिक स्तरावर सुरू होतो आणि त्याचे पडसाद आरोग्य, पोषण आणि शिक्षण या मूलभूत संसाधनांच्या वाटपावरही उमटतात, असं जयशंकर म्हणाले. या सत्रात आव्हानांना तोंड देत जागतिक स्तरावर कर्तृत्व गाजवणाऱ्या महिला नेत्यांच्या कामगिरीचाही गौरव करण्यात आला.
Site Admin | January 10, 2025 1:15 PM | Pravasi Bharatiya Divas