भारत देश एक आधुनिक, सर्वसमावेशक आणि प्रगतीशील समाज निर्माण करण्यासाठी दीर्घकालीन आव्हानांचा सामना करत सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून यशस्वीपणे प्रवास करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलं आहे. १८ व्या ‘प्रवासी भारतीय दिवस’ अधिवेशनाला आज सकाळी ओडिशात भुवनेश्वर इथं सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. ‘विकसित भारतासाठी प्रवासी भारतीयांचं योगदान’ ही यंदाच्या अधिवेशनाची संकल्पना आहे.
या अधिवेशनात ७५ देशांमधले सहा हजारापेक्षा जास्त अनिवासी भारतीय सहभागी होत आहेत.