हत्तीरोग निर्मूलनासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी हत्तीरोग प्रतिबंधात्मक गोळ्यांचं प्रत्येकाने सेवन करावं, असं आवाहन केंद्रीय आयुष कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केलं. हत्तीरोग निर्मूलनासाठी द्वैवार्षिक सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन दूरदृष्य प्रणालीद्वारे जाधव यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. हत्तीरोग हा आजार कायमस्वरूपी असल्यानं दिव्यांगांचे लाभ मिळण्यासाठी बाधित रुग्णांना ४५ टक्के अपंगत्वाचं प्रमाणपत्र द्यावं, असंही ते म्हणाले. पहिलं प्रमाणपत्र बुलढाणा येथे जाधव यांच्या हस्ते हत्तीरोगग्रस्त महिलेला देण्यात आलं. भारतातील २० राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातील ७ पूर्णांक ५ दशांश रुग्ण हत्तीरोगानं ग्रस्त आहेत.
Site Admin | August 10, 2024 7:43 PM | Eradication of elephantiasis | Prataprav Jadhav