खासगी पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावली अंतर्गत आणणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या संदर्भात आज मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. प्रवासी सुरक्षा, कार पुलिंग, परवाना, ट्रॅफिक समस्या या संदर्भातली पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने तयार करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी दिले आहेत. सर्व प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांअतर्गत चारचाकी, बाईक, टॅक्सी यांचा समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती देतानाच प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देणं, बाईक चालवण्यासाठी महिला चालकांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचंही सरनाईक यावेळी म्हणाले.
Site Admin | January 14, 2025 6:10 PM | Pratap sarnaik
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीत आणणार -प्रताप सरनाईक
