प्रसारभारती, रेलटेल आणि प्लेबॉक्सटीव्ही यांनी एकत्रितपणे रेलवायर ब्रॉडबॅन्ड ही स्वतंत्र योजना तयार केली आहे. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव दि्ववेदी आणि रेलटेलचे अध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार यांनी या योजनेचं आज नवी दिल्लीत उद्घाटन केलं. रेलवायर या रेलटेल कंपनीच्या किरकोळ इंटरनेट सेवेने ओटीटीसाठीची स्वतंत्र योजना आहे. या योजनेमुळे किफायतशीर दरात सर्वसामान्यांना वेगवान इंटरनेट सेवा मिळणार आहे. त्यात प्रसारभारतीच्या वेव्हजबरोबर इतर ९ ओटीटी सेवांचा तसंच ४०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल्सचा आणि २०० गेम्सचा समावेश आहे.
Site Admin | November 25, 2024 7:18 PM | Prasar Bharati