आगामी हॉकी इंडिया लीगचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी प्रसार भारतीनं आज नवी दिल्ली इथं हॉकी इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारामुळे, दूरदर्शन हॉकी इंडिया लीग २०२४-२५ साठी अधिकृत प्रसारण भागीदार बनले आहे.
या प्रसंगी हॉकी इंडिया लीग च्या प्रशासकीय समितीचे सदस्य भोलानाथ सिंग आणि प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांनी सामंजस्य कराराची देवाणघेवाण केली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, आकाशवाणीच्या महासंचालक प्रज्ञा पालीवाल गौर, दूरदर्शनच्या महासंचालक कांचन प्रसाद, दूरदर्शनच्या वृत्तविभागाच्या महासंचालक प्रिया कुमार आणि इतर अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.