प्रसारभारती आणि संसद टीव्ही यांच्यात आज एक सामंजस्य करार झाला. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आणि संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रजित पुन्हानी यावेळी उपस्थित होते. संसाधनांची देवाण-घेवाण कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आणि एकमेकांच्या कार्यक्रमांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी हा करार उपयुक्त ठरेल.
कार्यक्रमांची देवाण-घेवाण, प्रसारभारतीच्या ओटीटी मंचांवर संसद टीव्हीचं प्रसारण तसंच प्रशिक्षण सुविधांचा उपयोग करणं, हा या कराराचा उद्देश असल्याचं द्विवेदी यांनी सांगितलं.