वक्फ दुरुस्ती विधेयकाचा हेतू कुणाची मालमत्ता जप्त करणं नसून न्याय सुनिश्चित करणं हा आहे असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केलं. संसद परिसरात ते आज वार्ताहरांशी बोलत होते. या विधेयकाबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं जोशी म्हणाले. भाजपा खासदार दिनेश शर्मा यांनीही विधेयकाचं समर्थन केलं. विधेयकाला विरोध करणारे राज्यघटनेच्या विरोधात आहेत असं शर्मा म्हणाले.
वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत सरकार अल्पसंख्यक समुदायाची दिशाभूल करत असल्याची टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. नोटाबंदी, जीएसटी आणि असेच इतर निर्णय घेऊन सरकार जनतेकडून सतत काहीतरी हिसकावून घेत असतं असं यादव म्हणाले. भाकप खासदार संदोष कुमार यांनीही विधेयकाला विरोध केला. या विधेयकातल्या काही तरतुदी असंवैधानिक असल्याचा आरोप त्यांनी केला.
Site Admin | April 1, 2025 1:57 PM | प्रल्हाद जोशी | वक्फ सुधारणा विधेयक
वक्फ सुधारणा विधेयकाचा हेतू कुणाची मालमत्ता जप्त करणं नसून न्याय सुनिश्चित करणं असा असल्याचं प्रल्हाद जोशी यांचं स्पष्टीकरण
