टॅक्सी भाड्यात जागा आणि वेळेनुसार बदल होत असल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले आहेत. एकाच प्रवासाकरता अॅपल आणि अँड्रॉईड उपकरणांवरुन बुक केलेल्या टॅक्सीचं भाडं वेगवेगळं आकारलं जात असल्याची तक्रार आल्यावरुन केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण ही चौकशी करणार आहे. अशाच प्रकारे अन्नपदार्थ पोहोचवणाऱ्या सेवा, ऑनलाईन तिकिटं आरक्षण सेवा आणि इतर सेवांसाठीही भाडे आकारणीत फरक केला जात आहे का याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं जोशी यांनी समाजामाध्यमावरच्या पोस्टमधे लिहीलं आहे.
Site Admin | December 28, 2024 7:59 PM | Pralhad Joshi