मुद्रा योजनेनं उद्योजकतेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. यामुळे महिलांना आर्थिक सहाय्य तर मिळालंच पण त्यांच्या व्यवसायाच्या विकासासाठी अनेक संधी निर्माण झाल्या असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मुद्रा योजनेला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विविध लाभार्थ्यांशी नवी दिल्लीत चर्चा करताना ते बोलत होते.
देशातल्या तरुणांना सक्षम, स्वावलंबी करणं आणि त्यांना आत्मविश्वास मिळवून देणं तसंच केवळ नोकरी शोधणाऱ्यांऐवजी रोजगार निर्माण करण्याची क्षमता निर्माण करणं हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. या योजनेतून ३३ लाख कोटी रुपयांची कर्ज कुठल्याही तारणाशिवाय वितरीत झाली आहेत, असं ते म्हणाले.