केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं प्रधानमंत्री बाल पुरस्कारांसाठी अर्ज मागवले आहेत. भारतीय नागरिक असलेल्या पाच वर्ष वयापेक्षा अधिक आणि १८ वर्षांखालील मुलांसाठी ३१ जुलैपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत. हे अर्ज येत्या १ एप्रिपासून राष्ट्रीय पुरस्कार या वेबसाइटवर उपलब्ध असतील. लहान मुलांनी शोर्य, क्रीडा, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, संस्कृती या क्षेत्रात बजावलेल्या अतुलनीय कार्याबद्दल हे पुरस्कार देण्यात येतात.
Site Admin | March 27, 2025 8:28 PM | PradhanMantri Bal Puraskar
प्रधानमंत्री बाल पुरस्कारांसाठी अर्जप्रक्रिया सुरू
