शहरी भागातल्या गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळावं, यासाठी सर्वांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची गरज आहे, असं आवाहन प्रधानमंत्री आवास योजना २चे अभियान संचालक अजित कवडे यांनी केलं. मुंबईत आज या योजनेसंदर्भात कोकण विभागाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याकरता तत्काळ लाभार्थी नोंदणी सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या.
Site Admin | February 13, 2025 3:52 PM | PradhanMantri Awas Yojana
गरजूंना हक्काचं घर मिळण्यासाठी सर्वांनी काम करण्याची गरज – प्रधानमंत्री आवास योजना
