प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजनेला आज नवी दिल्लीत केंद्रीय मत्स्य उद्योग मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या हस्ते प्रारंभ झाला. सगळ्या राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या भागातल्या मच्छीमार समाजाला संघटित क्षेत्रात परावर्तित करण्यासाठी या डिजिटल व्यासपीठचं सदस्य होण्याकरिता प्रवृत्त करावं, असं ते म्हणाले. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राजीव रंजन सिंग बोलत होते. या क्षेत्रासाठी दरवर्षी ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून जगभरातल्या १२० देशांना भारत मासे पुरवतो अशी माहितीही त्यांनी दिली. मासेमारी क्षेत्रासाठी पायाभूत सोयीसुविधा,तंत्रज्ञान आणि उत्पादन या बाबतीत विकास साधण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे साध्य झाल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं.
Site Admin | September 11, 2024 6:25 PM | Pradhan Mantri Matsya Kisan Samriddhi Saha Yojana