डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 13, 2025 3:39 PM | Prabhakar Karekar

printer

ज्येष्ठ गायक प्रभाकर कारेकर यांचं निधन

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं काल रात्री प्रदीर्घ आजारानं मुंबई इथं त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. ‘बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल’, ‘मर्मबंधातली ठेव, नभ मेघांनी आक्रमिले’, ‘वक्रतुंड महाकाय’ ही त्यांची काही गाजलेली गीतं. त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी संगीताचे अनेक कार्यक्रम केले. ऍर्निट कोलेमन आणि सुलतान खान यांच्याबरोबर त्यांनी केलेला फ्युजन अल्बमही लोकप्रिय झाला. 

 

१९४४ मध्ये गोव्यात जन्मलेल्या कारेकर यांनी पंडीत सुरेश हळदणकर, पंडीत जितेंद्र अभिषेकी आणि पंडीत सी. आर. व्यास यांच्याकडून शास्त्रीय गायनाचं शिक्षण घेतलं. त्यांच्या संगीत कारकिर्दीच्या सन्मानार्थ त्यांना तानसेन सन्मान , संगीत नाटक अकादमी, लता मंगेशकर पुरस्कार, गोमान्त विभूषण पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. 

 

पंडित प्रभाकर कारेकर यांच्या निधनानं भारतीय शास्त्रीय संगीतातल्या वैभवशाली युगाचा अंत झाला आहे. त्यांच्या जाण्यानं शास्त्रीय संगीत क्षेत्रात एक महान तपस्वी हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा