मालवणच्या किनारपट्टीपासून दोन किलोमीटर अंतरावरच्या गावांतल्या विद्युत वाहिन्या आता भूमिगत होणार आहे. तसंच कुडाळ आणि मालवण तालुक्यांना जोडणारी वाहिनीही भूमिगत केली जाणार आहे. राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्पांतर्गत या कामासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणच्या मालवण आणि कुडाळ या विभागांसाठी ६७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
निसर्ग आणि तौकते चक्रीवादळात मालवण तालुक्यात वीजवाहिन्या आणि विद्युत खांब तुटून नुकसान झालं होतं, त्यामुळे वाहिन्या भूमिगत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.