रोजगार, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेषात गुंतवणूक ही संकल्पना विकसित भारताच्या मार्गाची रूपरेषा स्पष्ट करणारी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. यंदाच्या अर्थसंकल्पाच्या परिप्रेक्ष्यात रोजगारविषयक बाबींविषयी आयोजित वेबिनारला ते संबोधित करत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात या संकल्पनेचा प्रभाव दिसत आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प भारताच्या भविष्याची ब्लूप्रिंट आहे. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा आणि उद्योगांप्रमाणेच रोजगार, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेषालाही प्राधान्य दिलं आहे, असं मोदी म्हणाले.
क्षमतावाढ आणि प्रतिभेला प्रोत्साहन या दोन्ही बाबी देशाच्या प्रगतीसाठी पायाभरणी करतात. त्यामुळे विकासाच्या पुढच्या टप्प्यात आपल्याला या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक गरजेची असून त्यासाठी संबंधितांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. रोजगार आणि नवोन्मेष क्षेत्रात गुंतवणूक हा चर्चासत्राचा विषय आहे.