दिवाळीच्या मुहुर्तावर मुंबई शेअर बाजाराला काल गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. संवत 2081 च्या शुभमुहूर्तावर काल मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आले. विशेष व्यापार सत्रात काल मुबंई शेअर बाजाराचा निर्देशांक 335 अंकांने वाढून 79 हजार 724 वर बंद झाला तर राष्ट्रीय बाजार निर्देशांकांवर 99 अंकांना वाढून 24 हजार 304 वर स्थिरावला. प्री ट्रेडिंगचं विशेष व्यापार सत्र संध्याकाळी पावणेसहा ते सहा दरम्यान घेण्यात आलं.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या तीस वर्षांच्या कामकाजाच्या स्मरणार्थ अतिरिक्त आठ भाषांमध्ये मोबाईल अॅप तसंच संकेतस्थळांची सुरुवात करण्यात आली. 1994 मध्ये तीन नोव्हेंबरला राष्ट्रीय शेअर बाजारातले व्यवहार सुरू झाले होते. आसामी, बंगाली, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये अॅपची सुरू केल्याची माहिती राष्ट्रीय शेअर बाजाराचे संचालक आणि व्यवस्थापक आशिषकुमार चौहान यांनी दिली. त्यामुळे हे अँप 12 भाषांमध्ये उपलब्ध झालं आहे.