पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल नवी दिल्लीत ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माउरो व्हिएरा यांची भेट घेतली.या भेटी दरम्यान भारत आणि ब्राझील यांच्यातील हायड्रोकार्बन आधारित ऊर्जा भागीदारीबद्दल सकारात्मक चर्चा झाल्याचं पुरी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.याशिवाय व्यापारी गुंतवणुक आणि जैवइंधन क्षेत्रातील परस्पर सहकार्याच्या प्रयत्नांवरही चर्चा झाल्याचं पुरी यांनी सांगितलं. जागतिक जैवइंधन गटाची घोषणा झाल्यापासून याबाबतीत ब्राझीलच्या सातत्यपूर्ण समर्थनाबद्दल पुरी यांनी समाधान व्यक्त केलं. याशिवाय हंगेरी देखील या गटामध्ये सहभागी झाल्यामुळे आता 25 देश आणि 12 आंतरराष्ट्रीय संस्थांसह जागतिक जैवइंधन गटाची व्याप्ती विस्तारल्याचंही हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं.
Site Admin | August 28, 2024 9:51 AM
भारत आणि ब्राझील यांच्यात हायड्रोकार्बन आधारित ऊर्जा भागीदारीबद्दल सकारात्मक चर्चा
