डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रीय पोषण महिना उपक्रम राबविण्यात महाराष्ट्र आघाडीवर

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सातव्या राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमा अंतर्गंत आतापर्यंत ९ कोटी ६८ लाखांहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. यावर्षी राबवण्यात येत असलेल्या या अभियानात महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेश राज्यांनी चांगली कामगिरी केली असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. 

 

ॲनिमिया प्रतिबंध, पौष्टिक आहार आणि कल्याणकारी अभियानांतर्गत सुमारे एक कोटी ८८ लाख कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. एक कोटी ४५ लाख कार्यक्रमांत पूरक आहार सेवनावर आधारीत होते. सरकारनं पोषण आहार जागृती अभियना अंतर्गंत सुमारे एक कोटी ५९ लाख कार्यक्रम केले आहेत. पौष्टिक आहाराबरोबरच नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यावर भर देणारे उपक्रमही राबवल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्रालयानं दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा