महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या पोषण पंधरवड्याच्या सातव्या आवृत्तीची सुरुवात आजपासून होत आहे. या वर्षीचा पोषण पंधरवडा चार विषयांवर आधारित आहे. नवजात अर्भकांच्या पहिल्या १ हजार दिवसांमधलं संगोपन, पोषण ट्रॅकर योजनेच्या लाभार्थ्यांविषयी माहिती देणं, कुपोषणावरच्या उपायांचं प्रभावी व्यवस्थापन आणि लहान वयातला लठ्ठपणा दूर करण्यासाठी निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणं, या चार विषयांवर यंदाचा पोषण पंधरवडा साजरा होणार आहे. या उपक्रमाची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली असून या उपक्रमाचं उद्दिष्ट गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली आणि सहा वर्षांखालच्या मुलांच्या योग्य पोषणावर भर असा आहे.
Site Admin | April 8, 2025 1:29 PM | Poshan Pakhwada 2025
पोषण पंधरवड्याच्या ७व्या आवृत्तीला आजपासून सुरुवात
