केंद्र सरकारने, अंदमान आणि निकोबर बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेयरचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या शहराचं नामांतर ‘श्री विजय पुरम’ असं करण्यात येणार आहे.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी काल समाज मध्यमांवरील संदेशातून ही घोषणा करताना, वासहातवादी साम्राज्याच्या सर्व पाऊलखुणा मिटवून टाकण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.
देशाच्या इतिहासात पोर्ट ब्लेयरला अनन्यसाधारण महत्व असून, ‘श्री विजय पुरम’ हे देशाने स्वातंत्र्यलढ्यात मिळवलेल्या विजयाचं प्रतीक आहे असं ते म्हणाले.