पुण्यातल्या कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात दोषी आढळलेल्या दोन निलंबित पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी ‘पोलीस महासंचालक’ कार्यालयाकडे पाठवला आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे, आणि सहाय्यक निरीक्षक विश्वास तोडकरी अशी या दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत. निलंबनानंतर त्यांची विभागीय चौकशी सुरू होती. त्यात दोघे दोषी आढळले.
या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे आई-वडिल, ससूनचे दोन डॉक्टर यांच्यासह दहा जणांना अटक केली. तेव्हापासून सर्वजण अद्याप कारागृहात आहेत. त्यांना जामीन मिळालेला नाही.