पोप फ्रान्सिस यांच्यावर आज आज रोम इथल्या ‘बॅसिलिका ऑफ सेंट मेरी मेजर’ इथं अंत्यसंस्कार होत आहे. जगभरातून विविध देशांचे प्रतिनिधी, तसंच कॅथलिक ख्रिश्चन बांधव पोप फ्रान्सिस यांना आदरांजली वाहण्यासाठी रोममध्ये जमले आहेत. भारताचं प्रतिनिधित्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ हेसुद्धा यावेळी उपस्थित असतील.
त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी देशात आज दुखवटा पाळला जात आहे. सर्व शासकीय इमारतींवरचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकत आहेत. रोमन कॅथलिक चर्चचं नेतृत्व करणारे पहिले लॅटिन अमेरिकन पोप, पोप फ्रान्सिस यांचं २१ एप्रिल रोजी वयाच्या ८८व्या वर्षी निधन झालं होतं.