पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी आणि भारत सरकार आणि जनतेच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या व्हॅटिकन सिटी दौऱ्यावर रवाना झाल्या. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू आणि राज्यमंत्री जॉर्ज कुरियन तसंच गोवा विधानसभेचे उपाध्यक्ष जोशुआ डिसूझा त्यांच्या सोबत आहेत.
राष्ट्रपती मुर्मू व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटरच्या बॅसिलिका इथं पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहतील. उद्या त्या जगभरातल्या मान्यवरांसह पोप यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमात सहभागी होतील. यामुळे देशभरात उद्या दुखवटा पाळण्यात येणार आहे. पोप फ्रान्सिस यांचं २१ एप्रिलला व्हॅटिकनच्या कासा सांता मार्टा इथल्या त्यांच्या निवासस्थानी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं.