चित्रपटगृहात मिळणाऱ्या पॉपकॉर्नवर वस्तू आणि सेवा कराच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. पाकिटबंद तसंच लेबल लावून विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर १२ टक्के तर सुट्या खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी लागू आहे, चित्रपटगृहात मिळणारे पॉपकॉर्न हे सुट्या स्वरुपात विकले जात असल्यानं, त्यावर पाच टक्के दरानेच जीएसटी आकारला जात असल्याचं, जीएसटी परिषदेनं स्पष्ट केलं आहे.
Site Admin | December 26, 2024 10:25 AM | GST | Popcorn