डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वादग्रस्त पूजा खेडकरला १७ मार्चपर्यंत दिलासा

बनावट प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा लाभ घेतल्या प्रकरणी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाने येत्या १७ मार्चपर्यंत दिलासा दिला आहे. या काळात तपासाला सहकार्य द्यावं असं न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा  यांच्या पीठाने बजावलं आहे. पूजा खेडकरच्या जामीन अर्जाबाबत जबाब दाखल करायला सरकारी वकिलांनी आणखी मुदत मागितली, तेव्हा येत्या ३ आठवड्यात जबाब दाखल करावा असं न्यायालयाने सांगितलं.

 

दरम्यान, या प्रकरणी चौकशीसाठी पूजा खेडकरला पोलिसांनी अद्याप बोलावलेलं  नाही,  आणि बोलावल्यास ती सहकार्य करील, असं तिच्या वकिलांनी सांगितल्यावर येत्या १७ मार्चपर्यंत तिला अटक करु नये असं न्यायालयाने सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा