वादग्रस्त परिविक्षार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्र सरकारने तत्काळ भारतीय प्रशासकीय सेवेतून मुक्त केलं आहे. याबाबतचा आदेश काल जारी करण्यात आला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत फसवणूक करणं, गैरमार्गाने इतर मागासवर्गीय प्रवर्ग आणि दिव्यांग उमेदवारांसाठी असलेल्या सवलती लाटणं असे आरोप पूजा खेडकर यांच्यावर आहेत. भारतीय प्रशासकीय सेवा (परिविक्षा) नियम १९६५च्या नियम १२नुसार पूजा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Site Admin | September 7, 2024 7:27 PM | Pooja Khedkar Case