श्रीलंकेत सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार आज मध्यरात्री संपणार आहे. १९६ जागांसाठी ८ हजार ८०० हून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रधानमंत्री हरिणी अमारसुरिया, माजी प्रधानमंत्री दिनेश गुनवर्धने, विरोधी पक्षातले साजिथ प्रेमदास हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. गुरुवारी सकाळी ७ ते संध्याकाळी ४ वाजेदरम्यान १३ हजारांहून अधिक मतदान केंद्रावर मतदान होईल. यासाठी १ कोटी ७० लाखांहून अधिक मतदारांची नोंद झाली आहे. सुमारे ७५ हजार पोलीस सुरक्षेसाठी नियुक्त आहेत.
सप्टेंबरमध्ये NPP पक्षाचे अनुरा कुमारा दिसनायके अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी संसद बरखास्त करुन निवडणुकांचा मार्ग मोकळा केला होता.