दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची अधिसूचना काल जारी झाल्याच्या पार्श्वभुमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजधानीतल्या ७० जागांसाठी येत्या १७ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
या निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे अंतिम करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल संध्याकाळी दिल्ली पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह तसंच अन्य महत्त्वाचे पक्षनेते उपस्थित होते.