डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वादग्रस्त पॉडकास्टर रणवीर अलाहाबादीयाचा शोध सुरु

वादग्रस्त पॉडकास्टर रणवीर अलाहाबादीयाचा फोन बंद असून मुंबई पोलीस अद्याप त्याचा शोध घेऊ शकलेले नाहीत. समय रैनाच्या युट्युब वाहिनी वरच्या एका कार्यक्रमात त्यानं आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे जनतेत रोष पसरला असून त्याच्याविरोधात अनेक तक्रारी येत आहेत. दरम्यान, युट्युबर विनोदवीर रैनाला त्याच्या कार्यक्रमातल्या अलाहबादीयाच्या वादग्रस्त टिप्पणीच्या चौकशीत त्यांच्या समोर हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांनी येत्या १० मार्चपर्यंत वेळ दिला आहे. त्याचा क्लायंट अमेरिकेत असल्यानं रैनाच्या वकीलानं पोलिसांकडे अधिक वेळ मागितला होता, त्याच्या विनंती नुसार त्याला वाढीव वेळ देत १० मार्च ही तारीख दिली आहे. त्याचवेळी, अलाहबादीयानं त्याच्या निवासस्थानीच त्याचे जबाब नोंदविण्याची विनंती पोलिसांना  केली होती, परंतु खार पोलिसांनी ती फेटाळून लावली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा