प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत राज्यात २२ हजार १० प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. याअंतर्गत २० हजार प्रकल्पांचा टप्पा ओलांडणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. यात सर्वाधिक १ हजार ८९५ प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत. त्यानंतर अहिल्यानगर, सांगली या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. कृषी आयुक्तालयाच्या राज्य नोडल अधिकारी यांच्या कार्यालयानं ही माहिती दिली आहे. यामुळे राज्यात २ हजार २६३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून ३८९ कोटी रुपयांचं अनुदान लाभार्थ्यांना दिलं गेलं आहे. मंजूर झालेल्या प्रकल्पांमधे तृणधान्य उत्पादन, मसाले उत्पादन, फळ उत्पादन, दुग्ध उत्पादन, तेलबिया उत्पादन, पशुखाद्य उत्पादन, ऊस उत्पादन, मांस उत्पादन, सागरी उत्पादन आदी प्रकल्पांचा समावेश आहे.
Site Admin | February 25, 2025 9:15 PM | Maharashtra | PMFME
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र अग्रस्थानी
